Marathi Kavita Sandeep Khare

Marathi Kavita Sandeep Khare    

आज फार इच्छा होतीय, तुला येऊन भेटावं ...
तुझा हात हातात घेऊन वाऱ्याशी खेळावं...

तुझ्या शेजारी बसून चांदण्या मोजावं....
चंद्र प्रकाशातला तुझा चेहेरा तासन तास बघावं ...

रात्रीच्या थंडीला माझ्या मिठीने दूर करावं ...
तुझ्या केसांचा गंध माझ्या मनात उतरावं ...

केसांची बट तुझ्या चेहेऱ्यावरून बाजूला सावरावं
स्पर्शाची शहारे तुझ्या अंगावर जाणवावं

खरचं आज फार इच्छा होतीय तुला स्वप्नात तरी भेटावं
पण बघ ना रात्र उघड्या डोळ्यांना स्वप्न तरी कसं पडावं