Marathi Prem Kavita Sandeep Khare

Marathi Prem Kavita Sandeep Khare

काल पुन्हा स्वप्नात आलीस
जीवनात माझ्या येशील का
डोळ्यांच्या त्या नशील्या प्याल्यात
स्वतः ला हरवु देशील का

काळ्याभोर केसांशी खेळत
पावसात फिरायला येशील का
केसात मला चेहेरा लपवून
सुगंधात हरवू देशील का

इवल्याशा नाकावर राग घेवून
वाट पाहत थांबशील का
मी उशीर केला म्हणून
माझ्याच मिठीत रडशील का

ओठांच्या दोन पाकळ्या उघडून
माझे तू नाव घेशील का
‘इश्श’ म्हणून चेहेरा लपवत
डोळ्यांनी तुझ्या हसशील का

कवितेमध्ये माझ्या गुंतून
स्वप्नात नव्या हरवशील का
एकएक माझे स्वप्न वाचून
सत्यात ते उतरवशील का